¡Sorpréndeme!

Assam | आसामच्या कलाकाराने बनवले ई कचऱ्यापासून पोर्ट्रेट | Sakal |

2022-03-20 151 Dailymotion

Assam | आसामच्या कलाकाराने बनवले ई कचऱ्यापासून पोर्ट्रेट | Sakal |


पर्यावरणाचे रक्षणासाठी आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, गुवाहाटीस्थित एक कलाकार इलेक्ट्रॉनिक कचरा सामग्री वापरून पोर्ट्रेट बनवतो. 21 वर्षीय कलाकाराला लहानपणापासूनच ललित कलांची आवड आहे. त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून आसामचे मुख्यमंत्री, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे पोर्ट्रेट बनवले आहेत. राहुलने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले होते आणि त्याच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींसाठी अनेक पुरस्कार जिंकले होते. हा तरुण कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्ट्रेट तयार करण्याचा विचार करत आहे. “मला इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याबाबत जनजागृती करायची आहे. मी माझ्या रोल मॉडेल्सचे पोर्ट्रेट बनवतो ज्यांनी मला प्रेरणा दिली. मी पीएम मोदींचे पोर्ट्रेट बनवण्याचा विचार करत आहे, असे त्याने सांगितले


#Artist #FineArt #ElectronicWasteMaterial #Awareness #Marathinews #Assam